Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence


श्री कुमार मंगलम बिर्ला

चेअरमन, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड.

सहा खंडांतल्या 35 देशांमध्ये संचालन करणा-या 48.3 अब्ज डॉलर्सच्या बहुराष्ट्रीय आदित्य बिर्ला समूहाचे श्री कुमार मंगलम बिर्ला अध्यक्ष आहेत. कंपनीच्या महसुलापैकी 50 टक्क्यांहून अधिक महसूल भारताबाहेरील कार्यांमधून येतो.

birla

श्री कुमार मंगलम बिर्ला

चेअरमन, 
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड.

 

सहा खंडांतल्या 35 देशांमध्ये संचालन करणा-या 48.3 अब्ज डॉलर्सच्या बहुराष्ट्रीय आदित्य बिर्ला समूहाचे श्री कुमार मंगलम बिर्ला अध्यक्ष आहेत. कंपनीच्या महसुलापैकी 50 टक्क्यांहून अधिक महसूल भारताबाहेरील कार्यांमधून येतो.



संचालक मंडळ


सौ. राजश्री बिर्ला

नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर

birla

सौ. राजश्री बिर्ला

नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर

 

श्रीमती राजश्री बिर्ला आदित्य बिर्ला समूहाच्या सर्व प्रमुख कंपन्यांच्या संचालक आहेत. त्या आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्हज अॅण्ड रूरल डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

श्री. अरुण अधिकारी

स्वतंत्र संचालक

birla

श्री. अरुण अधिकारी

स्वतंत्र संचालक

 

अरुण अधिकारी हे कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कलकत्त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधून अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रामही केला आहे. 1977 मध्ये ते हिंदुस्थान लिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी भारत, यूके, जपान आणि सिंगापूरच्या युनिलिव्हर समूहांमध्ये काम केले आहे. त्याच्या जबाबदारीच्या क्षेत्रांमध्ये धोरण, कॉर्पोरेट विकास, विक्री, ग्राहक संशोधन आणि मार्केटिंग तसेच, सामान्य व्यवस्थापन आणि नेतृत्व भूमिका पार पाडण्याचा समावेश आहे. जानेवारी 2014 मध्ये ते युनिलिव्हरमधून निवृत्त झाले.

सुश्री अलका भरुचा

स्वतंत्र संचालक

birla

सुश्री अलका भरुचा

स्वतंत्र संचालक

 

सुश्री अलका भरुचा यांनी मुल्ला अँड मुल्ला अँड क्रेगी ब्लंट अँड कॅरो पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 1992 मध्ये अमरचंद आणि मंगलदास भागीदार सहभाग घेतला. 2008 मध्ये त्यांनी भरुचा अँड पार्टनर्सची स्थापना केली. ही संस्था तिच्या स्थापनेपासून लंडनच्या आरएसजी कन्सल्टिंग मार्फत क्रमवारी करण्यात आलेल्या भारतातल्या पहिल्या पंधरा कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. अनेक वर्षांपासून अलका यांना चेंबर्स ग्लोबल, लीगल 500 आणि डब्ल्यू एचओ च्या डब्ल्यूएचओ लीगलमध्ये भारतातील आघाडीच्या वकिलांमध्ये मानांकन मिळाए आहे अलका भरुचा अँड पार्टनर्सच्या व्यवहारांच्या अध्यक्ष आहेत. विलीनीकरण आणि अधिग्रहण, संयुक्त उपक्रम, खाजगी इक्विटी, बँकिंग आणि वित्त ही त्यांची प्रमुख क्षेत्रे आहेत. सुश्री अलकांना वित्त सेवा तसेच पॉवर अॅण्ड लॉजिस्टिक्स क्षेत्रातील क्लाएंटसाठी काम करण्याचा विशिष्ट अनुभव आहे. त्या रिटेल, सैन्य आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ट्रान्स-नॅशनल कंपन्यांचे सक्रियपणे प्रतिनिधित्व करतात.

 

श्री सुनील दुग्गल

स्वतंत्र संचालक

birla

श्री सुनील दुग्गल

स्वतंत्र संचालक

 

श्री. दुग्गल बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ऑनर्स आहेत. (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) बिट्स, पिलानी येथून आणि त्यांनी कलकत्त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून पदव्युत्तर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (मार्केटिंग) मिळवला आहे. श्री. दुग्गल 1994 मध्ये डाबर इंडिया लिमिटेडमध्ये रुजू झाले आणि त्यांनी 2002 ते 2019 पर्यंत 17 वर्षे एफएमसीजी मेजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आणि ते एफएमसीजी मेजरचे सर्वात दीर्घकाळ सेवा करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. इंडो-तुर्की जेबीसी आणि एफआयसीसीआय कमिटी ऑन फूड प्रोसेसिंग इ. समित्यांचे अध्यक्ष आणि सहअध्यक्षपद श्री. दुग्गल यांनी भूषवले आहे. त्यांना एफएमसीजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वेळा आणि भारतातील आघाडीच्या संपत्ती निर्मात्यांपैकी एक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2019 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्तातर्फे व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


श्री. अतुल डागा

पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी

birla

श्री. अतुल डागा

पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी

 

श्री. अतुल डागा अल्ट्राटेक सिमेंट लि. मध्ये एक पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी आहेत. अल्ट्राटेक मध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत, उदाहरणार्थ; गुंतवणूकदार संबंधांच्या व्यवस्थापनासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करणे, M&Aच्या संधींचे मूल्यमापन करणे, आणि देशांतर्गत आर्थिक बाजारात दीर्घकालीन कर्जांचे प्रस्थापित स्तर अधिक उंचावणे इत्यादि. ते शिक्षणाने सनदी लेखापाल असून त्यांना साधारण 29 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे, त्यातील दोन दशके आदित्य बिर्ला ग्रुपबरोबरची आहेत. 1988 साली त्या वेळच्या इंडियन रेयॉन लि. चाच एक भाग असलेल्या राजश्री सिमेंट च्या माध्यमातून ते ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यांनी कै.श्री.आदित्य बिर्लांसोबत कार्यकारी सहाय्यक म्हणून काम केले असून, यादरम्यान त्यांनी सिमेंट, अल्युमिनियम, कार्बन ब्लॅक आणि VSF & Chemicals इत्यादी व्यवसायांचे काम जवळून पाहिले आहे. श्री.डागा यांनी कॉर्पोरेट मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम्स चे पोर्टफोलिओधारक म्हणून आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि. च्या कॉर्पोरेट फायनान्स ग्रुप मध्ये काम केले आहे. 2007 साली, ते आदित्य बिर्ला रिटेल लि. या स्टार्ट-अपच्या आर्थिक विभागाचे प्रमुख म्हणून सहभागी झाले. साल 2010 पासून मुख्य वित्तीय अधिकारीपद सांभाळत त्यांनी एक मजबूत टीम तयार केली आहे. 2014 साली, श्री.डागा यांनी अल्ट्राटेक सिमेंट लि. चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.


बोर्ड समित्या


Download

Terms and Conditions of Independent Director

Download

Familiarisation Programme

Download

Notice from Shareholder 2021



Loading....