Get In Touch

Get Answer To Your Queries

acceptence


व्यवस्थापन टिम


श्री. के.सी. झंवर

व्यवस्थापकीय संचालक, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड.

kailash-jhanwar

श्री. के.सी. झंवर

व्यवस्थापकीय संचालक,
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड.

 

श्री. के.सी. झंवर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांना समूहात 38हून जास्त कारकिर्दीचा प्रदीर्घ अनुभव आहे. व्यवसायाने सनदी लेखपाल असलेले श्री. झंवर 1981 मध्ये आदित्य बिर्ला समूहाच्या सिमेंट व्यवसायात मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले.  

 

समूहात त्यांनी सिमेंट आणि रासायनिक विभागांमध्ये वित्त, संचालन तसेच सर्वसामान्य व्यवस्थापन भूमिकांमध्ये कार्य केले असून त्यांना प्रकल्प व्यवस्थापन आणि  व्यावसायिक कौशल्यांमध्ये निपुणता प्राप्त आहे. अधिग्रहण आणि एकत्रीकरणात देखील त्यांचा अनुभव वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या नेटवर्किंग आणि ग्राहक व अन्य स्टेकहोल्डर्ससोबत संबंध निर्माण कौशल्यांमध्ये त्यांच्या अनुभवाला तोड नाही, त्यांनी व्यवसायासाठी सशक्त फ्रेंचाइजची उभारणी केली आहे. ते एक सक्षम संघ निर्माता आणि शक्तीशाली लोककौशल्य असलेले व्यक्तीमत्व आहेत.

श्री राज नारायणन

व्यवसाय प्रमुख आणि मुख्य उत्पादन अधिकारी

raj-narayanan

श्री राज नारायणन

व्यवसाय प्रमुख आणि मुख्य उत्पादन अधिकारी

 

 श्री. राज नारायणन हे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचे ​​व्यवसाय प्रमुख आणि मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. अल्ट्राटेकमध्ये सामील होण्यापूर्वी, ते क्लोर अल्कली आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या व्हीएफवाय विभागांचे समुह कार्यकारी अध्यक्ष होते. समुहातील त्याच्या इतर कार्यकाळात, त्यांनी इन्सुलेटर ऍंड फर्टिलायजर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ओव्हरसीज केमिकल व्यवसायांचे वरिष्ठ अध्यक्षपद भुषवले आहे. 

 

2008 मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये सामील होण्यापूर्वी, श्री राज नारायणन यांनी रसायने आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील अग्रणी कंपन्यांमध्ये काम केले आहे. ते लिंडे गॅसेस इंडिया लिमिटेडचे ​​एमडी, लँक्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एमडी आणि भारतातील बायर केमिकल्सचे कंट्री हेड होते.

 

2018 मध्ये आदित्य बिर्ला समूहाच्या अध्यक्षांचा उत्कृष्ट नेता पुरस्कार त्यांनी मिळवला होता.. ते रसायन अभियंता आहेत.

श्री. विवेक अग्रवाल

समूहाचे कार्यकारी अध्यक्ष, प्रमुख विपणन अधिकारी

vivek-agarwal

श्री. विवेक अग्रवाल

समूहाचे कार्यकारी अध्यक्ष, प्रमुख विपणन अधिकारी

 

श्री विवेक अग्रवाल हे अल्ट्राटेक सिमेंटचे व्यवसाय प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी आहेत. श्री अग्रवाल यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा एक मोठा भाग अल्ट्राटेकच्या सिमेंट व्यवसायात घालवला आहे, ज्यात अनेक महत्त्वाची पदे आहेत. ते 1993 मध्ये सिमेंट मार्केटिंग विभागात झोनल मॅनेजर म्हणून ग्रुपमध्ये सामील झाले आणि झोनल हेड - ग्रे सिमेंट साउथ सारख्या महत्त्वाच्या पदांचा भार सांभाळला. [प्रमुख, विपणन - बिर्ला व्हाईट; आणि प्रमुख - RMC व्यवसाय.] 

 

श्री अग्रवाल यांनी 2010 मध्ये अधिग्रहित अस्तित्व स्टार सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आणि ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांनी सिमेंट व्यवसायाच्या मुख्य विपणन अधिकाऱ्याची भूमिका घेतली. श्री अग्रवाल यांना 2017 मध्ये आदित्य बिर्ला फेलो म्हणून नामांकित करण्यात आले होते, आणि 2019 मध्ये अध्यक्षांचा उत्कृष्ट नेता पुरस्कार प्रदान करण्यात आला   . ते एनआयटी अलाहाबाद येथून बीई (ऑनर्स) आणि एफएमएस, दिल्ली येथून एमबीए आहेत. त्यांनी आपला प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम (एएमपी) व्हार्टन बिझनेस स्कूलमधून केला आहे

श्री. अतुल डागा

पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी

atul-daga

श्री. अतुल डागा

पूर्णवेळ संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी

 

श्री. अतुल डागा अल्ट्राटेक सिमेंट लि. मध्ये एक पूर्णवेळ संचालक आणि प्रमुख वित्तीय अधिकारी आहेत. अल्ट्राटेक मध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत, उदाहरणार्थ; गुंतवणूकदार संबंधांच्या व्यवस्थापनासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करणे, M&Aच्या संधींचे मूल्यमापन करणे, आणि देशांतर्गत आर्थिक बाजारात दीर्घकालीन कर्जांचे प्रस्थापित स्तर अधिक उंचावणे इत्यादि. ते शिक्षणाने सनदी लेखापाल असून त्यांना साधारण 29 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे, त्यातील दोन दशके आदित्य बिर्ला ग्रुपबरोबरची आहेत. 1988 साली त्या वेळच्या इंडियन रेयॉन लि. चाच एक भाग असलेल्या राजश्री सिमेंट च्या माध्यमातून ते ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यांनी कै.श्री.आदित्य बिर्लांसोबत कार्यकारी सहाय्यक म्हणून काम केले असून, यादरम्यान त्यांनी सिमेंट, अल्युमिनियम, कार्बन ब्लॅक आणि VSF & Chemicals इत्यादी व्यवसायांचे काम जवळून पाहिले आहे. श्री.डागा यांनी कॉर्पोरेट मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम्स चे पोर्टफोलिओधारक म्हणून आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रा.लि. च्या कॉर्पोरेट फायनान्स ग्रुप मध्ये काम केले आहे. 2007 साली, ते आदित्य बिर्ला रिटेल लि. या स्टार्ट-अपच्या आर्थिक विभागाचे प्रमुख म्हणून सहभागी झाले. साल 2010 पासून मुख्य वित्तीय अधिकारीपद सांभाळत त्यांनी एक मजबूत टीम तयार केली आहे. 2014 साली, श्री.डागा यांनी अल्ट्राटेक सिमेंट लि. चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.


श्री रमेश मित्रगोत्री

मुख्य मनुष्यबळ अधिकारी

ramesh-mitragotri

श्री रमेश मित्रगोत्री

मुख्य मनुष्यबळ अधिकारी

 

रमेश मित्रगोत्री हे एक एचआर व्यावसायिक आहेत ज्यांना विविध उद्योग व विभागांमध्ये उदा. ग्राहकोपयोगी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग आणि बांधकाम, परफॉर्मन्स मटेरियल, सिमेंट, रिटेल आणि केमिकल्स   कौटुंबिक मालकीच्या कंपन्यांमध्ये आणि  व्यवस्थापन केल्या जाणा-या बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये सुमारे 35 वर्षांचा अनुभव आहे.  ते व्यवसायाच्या संस्थेच्या परिवर्तनात आणि तसेच व्यवसाय जीवनचक्रांमध्ये व्यवस्थापनातील बदलात सामील आहेत. व्यवसाय आणि लाइन व्यवस्थापकांशी भागीदारीबद्दल असलेल्या त्यांच्या ज्ञानामुळे त्यांनी कठीण काळात संस्थांचे यशस्वीपणे चालन केले आहे.

 

2007 मध्ये ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये सिमेंट व्यवसायात प्रमुख - मनुष्यबळ (विपणन विभाग) म्हणून सामील झाले.  2009 मध्ये ते आदित्य बिर्ला रिटेल लिमिटेडमध्ये चीफ पीपल ऑफिसर म्हणून रुजू झाले.  2015 मध्ये, ते ग्रुप हेड-एंप्लॉइ म्हणून संक्षिप्तपणे स्थानांतरित झाल्यावर त्यांच्यावर इतर जबाबदा-यांमध्ये एबीजी कार्यांसोबत सेंच्युरी ग्रुपला संरेखित करण्याचे काम सोपवण्यात आले.  त्यानंतर ते सीएचआरओ - रासायनिक, खते आणि इन्सुलेटर्स बिझनेस बनले  नोव्हेंबर 2016 मध्ये, अल्ट्राटेक सिमेंटसाठी सीएचआरओ म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला जो या काळात अधिग्रहण आणि वास्तविक किंवा ऑरगॅनिक विकासामार्फत वेगाने विस्तारीत होत आहे.

श्री. आशिष द्विवेटी

सीईओ- बिर्ला व्हाईट

ashish-dwivedi

श्री. आशिष द्विवेटी

सीईओ- बिर्ला व्हाईट

 

श्री. आशिष द्विवेदी हे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा व्हाईट सिमेंट व्यवसाय असलेल्या बिर्ला व्हाईटचे सीईओ आहेत. ते केमिकल इंजिनिअर आहेत आणि त्यांनी एमबीए केलेले आहे. ते २३ वर्षांहूनही अधिक काळ आदित्य बिर्ला समूहासोबत जोडलेले आहेत. ते अनेक धोरणात्मक उपक्रमांचा एक अंतर्गत हिस्सा आहेत, ज्यात मर्जर्स (विलीनीकरण) आणि ॲक्विझिशन्स (अधिग्रहण), समूहातील प्रक्रियांचे रिस्ट्रक्चरिंग (पुनर्रचना) व बिल्डिंग-अप (उभारणी) यांचा समावेश आहे.                

 

सध्या ते ज्या भूमिकेत आहेत, त्यापूर्वी ते याच समूहाच्या स्पेशॅलिटी केमिकल्स अँड बिझिनेस स्ट्रॅटेजी फॉर केमिकल्स, फर्टिलायझर्स अँड इन्शुलेटर सेक्टरचे अध्यक्ष होते. त्यांनी वेगवेगळ्या उत्पादनांसाठी डाऊनस्ट्रीम स्पेशॅलिटी केमिकल्स व्यवसाय उभारला आणि मिठाच्या व्यवसायाच्या अपस्ट्रीमचे श्रेयही त्यांनाच जाते. 

Loading....