Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence

ओपीसी सिमेंट म्हणजे काय?

ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा (ओपीसी) वापर वेगवेगळ्या उपयोगांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे RCC, आणि दगडी बांधकामापासून ते प्लास्टरिंग, प्रीकास्ट आणि प्रीस्ट्रेसच्या कामांपर्यंत आहे. ह्या सिमेंटचा उपयोग सामान्य, दर्जेदार आणि उच्च क्षमतेच्या काँक्रीटसाठी केला जातो, सिमेंट आणि वाळूचे मिश्रण, सर्वसाधारण रेडी मिक्स आणि ड्राय लीन मिक्स यांसाठी केला जातो.

logo


ओपीसी सिमेंटचे प्रकार

अल्ट्राटेक ओपीसी सिमेंट हा सिमेंटचा प्राथमिक प्रकार आहे. ऑर्डिनरी पोर्टलॅंड सिमेंटचे पुढे 28व्या दिवशीच्या त्याच्या क्युब कंप्रेसिव्ह दृढतेच्या आधारावर चार ग्रेड्समध्ये वर्गीकरण होते: 33, 43, 53, आणि 53-S.
 

  • ओपीसी 33: जेव्हा 28 दिवशी क्युब कॉंप्रिहेन्सिव्ह दृढता 33N/mm2 पेक्षा जास्त असते, तेव्हा सिमेंटला 33 ग्रेडचे ओपीसी सिमेंट संबोधले जाते
 
  • ओपीसी 43: 28 दिवशी या सिमेंटची क्युब कॉंप्रिहेन्सिव्ह दृढता किमान 43N/mm2 असेल. याला प्राथमिकपणे सर्वसामान्य ग्रेडच्या कॉंक्रीट आणि गंवडी कामाच्या कार्यांमध्ये वापरले जाते.
 
  • ओपीसी 53: 28 दिवशी या सिमेंटची क्युब कॉंप्रिहेन्सिव्ह दृढता किमान 53N/mm2 असेल. याचा उपयोग उच्च ग्रेडच्या आणि उच्च प्रदर्शनाच्या संरचनात्मक ऍप्लिकेशन्स/ कार्यांमध्ये केला जातो उदा. रिइन्फोर्स्ड सिमेंट कॉंक्रीट, प्रिस्ट्रेस्ड कॉंक्रीट, उच्च वेगाची बांधकामे उदा. स्लिपफॉर्म कार्य आणि प्रिकास्ट ऍप्लिकेशन्स याचा मोठ्याप्रमाणातल्या कॉंक्रीटसाठी, नॉन स्ट्रक्चरल ऍप्लिकेशन्स किंवा अति तीव्र वातावरणांमधल्या बांधकामांमध्ये उपयोग करण्याची शिफारस केली जात नाही.
 
  • ओपीसी53-S: हे विशेष ग्रेडचे ओपीसी आहे ज्याची रचना खासकरुन प्रिस्ट्रेस्ड कॉंक्रीट रेल्वे सिपर्ससाठीच करण्यात आली आहे.


43 आणि 53 ओपीसी सिमेंट ग्रेड्समध्ये काय फरक आहे?

43 आणि 53 ओपीसी सिमेंट ग्रेड्स 28 दिवसांनंतर अतिशय उच्च मजबूती दर्शवतात. या दोन ऑर्डिनरी पोर्टलॅंड सिमेंट ग्रेड्सचा सर्वात जास्त प्रमाणात उपयोग होतो.

यांच्यामधले फरक खालीलप्रमाणे आहेत.

 

  • 28 दिवसांनंतर 53 ग्रेडचे सिमेंट 530kg/sq cm एवढी दृढता प्राप्त करते तर 43 ग्रेडचे सिमेंट 430kg/sq cm एवढी दृढता प्राप्त करते
  • 53 ग्रेड सिमेंटचा वापर उच्च वेगाच्या बांधकामांमध्ये होतो उदा. ब्रीज, रस्ते, बहुमजली संरचना आणि थंड वातावरण कॉंक्रीट  43 ग्रेडचे सिमेंट सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते.
  • 53 ग्रेडच्या सिमेंटमध्ये सेट होण्याचा कालावधी जलद असतो आणि याची दृढता जलदगतीने विकसीत होते. 28 दिवसांनंतर दृढता फार लक्षणीयपणे वाढत नाही. जरी ते सुरुवातीला कमी दृढतेने आरंभ करत असले तरी कालांतराने 43 ग्रेडच्या सिमेंटमध्ये चांगली दृढता निर्माण होते.
  • 43 ग्रेडचे सिमेंट तुलनेने कमी हायड्रेशन हीट निर्माण करते, तर 53 ग्रेडचे सिमेंट लवकर सेट होते आणि मोठ्या प्रमाणात हीट मुक्त करते. परिणामत: 53 ग्रेडच्या सिमेंटमध्ये सुक्ष्म भेगा असतात पण त्या पृष्ठभागावर आढळत नाही आणि पुरेश्या प्रमाणात क्युअरींग करण्याची आवश्यकता असते.
  • 53 ग्रेडचे सिमेंट  43 ग्रेडच्या सिमेंटपेक्षा थोडेसे महाग असते.

     
logo


ओपीसी सिमेंटचे उपयोग

ओपीसी हे जगात सर्वात मोठ्याप्रमाणात वापरले जाणारे सिमेंट आहे. याच्या उत्पादनाचा खर्च कमी असल्यामुळे बांधकाम उद्योगातले हे अतिशय प्रसिध्द सिमेंट आहे.

 

याचा खालील ठिकाणी सर्रास वापर पहायला मिळतो.


गगनचुंबी संरचनांचे बांधकाम

logo

रस्ते, धरणे, पुल आणि फ्लायओव्हर्सचे बांधकाम

logo

ग्राउट्स आणि मोर्टर्सची निर्मिती

logo

रहिवासी आणि औद्योगिक कॉंप्लेक्सचे बांधकाम

logo


निष्कर्ष

पोझ्झोलॉनिक साहित्याची पोर्टलँड सिमेंटच्या हायड्रेटिंगमुळे मुक्त होत असलेल्या कॅल्शिअम हायड्रॉक्साईडसोबत रासायनिक अभिक्रिया होऊन सिमेंटिशिअस संयुगे तयार होत असल्याने पीपीसीमुळे काँक्रीटची पाणी झिरपू न देण्याची क्षमता आणि घनता वाढते. याचा वापर हायड्रॉलिक स्ट्रक्चर्स, मरिन वर्क्स, मोठ्या प्रमाणावरील काँक्रीटीकरण आणि आणखी बर्‍याच गोष्टींसाठी आत्मविश्वासाने केला जाऊ शकतो. यामुळे अल्कलीच्या प्रतिक्रियेपासून काँक्रीटचे संरक्षण होते.


Loading....